व्यवस्थात्मक बदल
व्यवस्थात्मक बदल
व्यवस्थात्मक बदल
व्यवस्थात्मक बदल
व्यवस्थात्मक बदल
व्यवस्थात्मक बदल
भारतातील ग्रामीण जिल्हा परिषद शाळांमधे शैक्षणिक परिवर्तन घडण्यासाठी व्यवस्थात्मक बदलांची आवश्यकता आहे असा विश्वास ग्यानप्रकाश फाउंडेशनला वाटतो. हे परिवर्तन घडून येण्यासाठी संस्थेला दोन घटक महत्त्वाचे वाटतात. ते असे-
  1. केंद्रस्तरीय शिक्षण परिषद प्रक्रियांची प्रभावी अंमलबजावणी
  2. स्थानिक समुदायाने गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेणे

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद प्रक्रियांची प्रभावी अंमलबजावणी

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने / राज्य प्रशिक्षण संस्थेने ऑगस्ट २०१६मध्ये राज्यस्तरावरच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षण परिषदांचा समावेश केला होता. ग्यानप्रकाश फाउंडेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये ४ जिल्ह्यांमधल्या मिळून ६०६ केंद्रांपैकी ५५० केंद्रांवर दर महिन्याला नियमितपणे शिक्षण परिषदा होत आहेत. त्यापैकी १५२ केंद्रांमधल्या शिक्षण परिषदांनी वैयक्तिकृत शिक्षण योजनेची संकल्पना उचलून धरली आहे. त्या आपापल्या केंद्रांमधील शिक्षकांना या योजनेवर काम करून तिची वर्गात अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.

स्थानिक समुदायाने गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेणे

मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे याची जबाबदारी शिक्षण यंत्रणेइतकीच पालक, ग्रामस्थ आणि पंचायत राज व्यवस्थेचे सदस्य यांचीदेखील आहे. पंचायती राज संस्था (PRI) आणि शाळा व्यवस्थापन समित्या (SMC) यांच्या एकत्रित विचारातून आणि समन्वयाने शाळा विकासाची दिशा, गरजांची निश्चिती, संसाधनांची उपलब्धता,आवश्यक कृतियोजना, नियमित आढावा असे शैक्षणिक परिवर्तनाचे शाश्वत प्रारूप उभे राहताना दिसते . याच भूमिकेतून या संस्था बळकट करण्यासाठी आणि विविध स्तरांवरच्या भागधारकांमधला संवाद सुधारण्यासाठी ग्यानप्रकाश फाउंडेशन काम करत आहे. त्यातूनच संस्थेने शाळा व्यवस्थापन समिती आणि शैक्षणिक ग्रामसभा याबाबतीत दिशादर्शक काम उभे केले आहे.
सन २०१३पासून संस्थेचा महाराष्ट्र राज्य शासनाच्या शाळा व्यवस्थापन समिती संसाधन आणि प्रशिक्षण संच निर्मितीमधे सक्रीय सहभाग आहे. सन २०१४मध्ये विद्या परिषदेच्या माध्यमातून संस्थेने आपले शाळा व्यवस्थापन समितीविषयक कार्य महाराष्ट्र शासनाच्या ‘उल्लेखनीय पद्धती’ म्हणून NCERT दिल्ली येथे देशातील प्रतिनिधींसमोर सादर केले आहे.
आपण आयुष्यभर शिकत असतो. . स्वत: मूल , शिक्षक, पालक, शिक्षण व्यवस्था, स्थानिक समुदाय हे सर्व घटक शिक्षण प्रक्रियेवर प्रभाव टाकतात . शाश्वत शैक्षणिक परिवर्तन घडून येण्यासाठी शैक्षणिक प्रक्रियांची जबाबदारी भागधारकांवर असायला हवी. त्यादृष्टीने या सर्व भागधारकांना बळकट करण्याचे आणि त्यांच्यात क्षमताधिष्ठित दृष्टीकोन विकसित करण्याचे काम ग्यानप्रकाश फाउंडेशन करत आहे.

मुलांच्या शिक्षणातील पालकांचा सहभाग अधिक बळकट करणे

ज्ञान प्रकाश फाउंडेशनच्या 4 जिल्ह्यांतील SMCs मजबूत करण्याच्या कार्यामुळे 50% पेक्षा जास्त शाळा (4408 शाळा) मासिक SMC बैठका नियमित करत आहेत. यापैकी, सुमारे 1200 शाळा त्रैमासिक पालक शैक्षणिक पुनरावलोकने घेतात, ज्यामध्ये प्रत्येक मुलाच्या सामर्थ्याबद्दल आणि प्रगतीवर चर्चा केली जाते. हे पालकांना त्यांच्या मुलाच्या शिकण्यात गुंतण्याची संधी देते.

पालकही मुलाांचे शिक्षक

मुलांच्या एकंदर वाढीच्या आणि विकासाच्या दृष्टीने त्यांच्या वयाची सुरवातीची वर्षे अत्यंत महत्त्वाची असल्याचे दिसून येते . या काळात मुलांच्या विकासामध्ये पालकांचा सहभाग असेल तर त्याचा मुलाच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि वागणुकीवर चांगला परिणाम होऊ शकतो. ‘पॅरेंट्स अॅज अर्ली टीचर्स’ किंवा ‘पालक हेच पहिले गुरू’ हा कार्यक्रम ग्रामीण भागातल्या पूर्वप्राथमिक वयातल्या मुलांच्या पालकांकरता, विशेषत: माता पालकांसाठी आहे. या कार्यक्रमात मुलांच्या विकासाबाबत पालकांची समज तयार करण्याचे काम केले जाते. तसेच घरात आणि दैनंदिन जीवनात विविध अनुभव घेण्यास मुलांना मदत करून त्यांना शाळेत जाण्यासाठी तयार कसे करायचे यासाठी पालकांना मार्गदर्शन केले जाते. पालकांचे मुलांशी असलेले नाते दृढ करणारा हा कार्यक्रम – Gooru Learning Navigator या तंत्रज्ञानाच्या मदतीने अंमलात आणला जातो. यामधे भाषेची ओळख, संख्यांविषयीची जाणीव,,कारक विकास, लिखाणाची पूर्वतयारी, सामाजिक-भावनिक विकास तसेच वैयक्तिक निगा आणि आत्मनिर्भरता यावर भर दिला जातो. घरगुती वस्तूंच्या मदतीने आपल्या मुलाला एखाद्या संकल्पनेची ओळख कशी करून द्यावी याबद्दल मातांना मार्गदर्शन करणारी व्हिडीओ सत्रे यामध्ये आहेत. ही व्हिडीओ सत्रे मुलांच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्याशी जोडलेली आहेत. सध्या साताऱ्यातील (महाराष्ट्र) एका तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) या योजनेमार्फत ग्यानप्रकाश फाउंडेशन हा उपक्रम राबवतआहे.