क्षमताधिष्ठित शिक्षण
क्षमताधिष्ठित शिक्षण
यासाठी शिक्षण व्यवस्थेने प्रत्येक मुलाच्या शैक्षणिक गरजा समजून घ्यायला प्राधान्य द्यावे अशी ग्यानप्रकाश फाउंडेशनची भूमिका आहे. प्रत्येक मूल वर्गनिहाय गुणवत्तेत कुठे आहे हे मूल्यमापन प्रक्रियेच्या मदतीने शिक्षकांना समजते. मात्र केवळ मुलांचे शिकणे तपासून बघणे हा या मूल्यमापनाचा उद्देश नाही. . प्रत्येक मुलाच्या शिकण्याची सद्यस्थिती समजून घेणे व त्यानुसार प्रत्येक मुलाला पुढील पातळीवर घेऊन जाण्यासाठी नियोजन करणे हे या मूल्यमापनातून होणे गरजेचे आहे. यासाठी मूल कसे शिकते, मुलांच्या शैक्षणिक गरजा समजून घेण्यासाठी मूल्यमापन माहितीचा उपयोग कसा करावा, प्रत्येक मुलासाठीचे नियोजन व पर्यायाने पूर्ण वर्गाच्या गुणवत्ता वाढीसाठी नेमके कोणते प्रयत्न करावे याची समज आणि त्यासाठी लागणारी कौशल्ये शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांच्यात विकसित झाली तर हे मूलनिहाय नियोजन करणे शक्य होईल. . यासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांच्या माध्यमातून क्षमताधिष्ठित शिक्षणाचा दृष्टीकोन विकसित व्हावा याकरता ग्यानप्रकाश फाउंडेशन प्रयत्न करते.
तसेच जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे (DIET)अधिकारी आणि तालुकास्तरीय अधिकारी यांनीदेखील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या माहितीवरून शैक्षणिक आढावा घ्यावा आणि पुढील नियोजन करावे यासाठी संस्था प्रयत्न करते.
सन २०१९मध्ये ग्यानप्रकाश फाउंडेशनने शिक्षकांसाठी लर्निंग नॅव्हिगेटर उपलब्ध करून दिला. लर्निंग नॅव्हिगेटर हे गुरू (Gooru) या ना-नफा तत्वावर चालणाऱ्या शिक्षण तंत्रज्ञान संस्थेने तयार केलेले एक तंत्रज्ञान आहे. लर्निंग नॅव्हिगेटरचा पाया क्षमताधिष्ठित शिक्षण पद्धत हाच आहे. प्रत्येक मूल विविध क्षमतांच्या बाबतीत नेमके कुठे आहे हे दाखवण्याचे आणि शिक्षणाच्या बाबतीतल्या आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी त्यांना मदत करण्याचे काम लर्निंग नॅव्हिगेटर करते. या प्लॅटफॉर्मवर दिलेल्या मूल्यांकन पद्धती वापरून शिक्षक आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाने कोणत्या क्षमता आत्मसात केल्या आहेत हे समजून घेऊ शकतात. मग त्यानुसार मुलांच्या सध्याच्या शिक्षण पातळीला अनुसरून त्यांना आवश्यक ती शिक्षण संसाधने उपलब्ध करून देऊ शकतात. ग्रामीण भागात जिथे इंटरनेट जोडणी अत्यंत कमी असते अशा ठिकाणी लर्निंग नॅव्हिगेटर कोणत्याही अडचणीशिवाय वापरता यावा यासाठी ग्यानप्रकाश फाउंडेशनने काम केले आहे. आपापल्या वर्गात क्षमताधिष्ठित शिक्षण अमलात आणण्यासाठी ४ जिल्ह्यांमधले २६०० शिक्षक गुरू नॅव्हिगेटर वापरत आहेत.

Personalised Learning Plan

Over the last 4 years, the number of teachers in Cluster Academic Meetings preparing personalized learning plans for children in the 4 districts (Nandurbar, Parbhani, Solapur, Satara) has increased, with 5175 teachers currently implementing competency based education in their classrooms.

Teachers Preparing Personalised Learning Plan

Technology Enabling Competency Based Education

In 2019, Gyan Prakash Foundation introduced the Learning Navigator  to teachers.  The Learning Navigator is a technology platform developed by Gooru- an educational technology non-profit organization dedicated to honoring the human right to education. The Learning Navigator is a digital data back-bone that can accurately locate the child in terms of abilities and help them reach their learning goals.

The technology platform provides teachers with a data backbone to track the real time learning progress of their students. Teachers can use assessments from the platform to understand the competencies gained by each student in their classroom and assign learning resources to students based on their current learning levels.

What is the Learning Navigator?

GPF completed the pilot of Learning Navigator in Manwath block in Parbhani district of Maharashtra, to demonstrate its impact on competencies in children. The pilot included 200 teachers and 9000 children from 70 schools in Manwath block. This project has been implemented in alignment and with support of the local authorities at the district as well as block level. The local authorities continue to be an integral part of the implementation of the Learning Navigator tool in the classroom.

GPF has worked on contextualizing the Navigator to work in rural areas with less connectivity. 2600 teachers across the 4 districts are using Gooru Navigator to implement competency based education in their classrooms. 

GPF has ventured into a partnership with Gooru, to develop the Learning Navigator platform for supporting core-competencies in children across math and language in the primary grades of classes 1 to 5. GPF has developed the Math competency framework (Class 1 to 5) to precisely ‘locate’ the child’s knowledge and skills in Math. This framework and the content development effort has been recognized by MSCERT.