शिकणे नैसर्गिक आहे
मूल आपापल्या गतीने शिकते
मुलांच्या शिक्षणात गावाचा सहभाग
शिकणे नैसर्गिक आहे
मूल आपापल्या गतीने शिकते
मुलांच्या शिक्षणात गावाचा सहभाग
प्रत्येक माणसात शिकण्याची उपजत क्षमता दिसून येते. शिकण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला तर प्रत्येकाला आयुष्यभर नवनवीन गोष्टी शिकण्यातला आनंद लुटता येईल. वर्गातील सगळी मुले एकाच पातळीवर आहेत असे गृहीत धरून शिकवण्यापेक्षा त्यांना आपापल्या क्षमतेनुसार शिकायला मिळाले तर ते शिकणे अधिक उपयोगाचे ठरेल. प्रत्येक मुलाला त्याच्या क्षमतेनुसार शिकवायचे असेल तर त्या दृष्टीने वर्ग प्रक्रिया ठरवाव्या लागतील. मूल कसे शिकते हे समजून घेण्यासाठी गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळ ग्यानप्रकाश फाऊंडेशनचा अभ्यास आणि विविध शैक्षणिक प्रयोग चालू आहेत. तसेच अनेक संस्थांच्या सहयोगाने ग्यानप्रकाश काम करत आहे. या अनुभवातूनच ‘ प्रत्येक मूल वेगळे असल्यामुळे त्याला आपापल्या गतीने शिकता यायला हवे, प्रगती करता यायला हवी’ ही संस्थेची भूमिका सिद्ध झालेली आहे. शिक्षक, पालक, शाळा, स्थानिक समुदाय आणि शिक्षणसंस्था यांना सामावून घेणारा असा हा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आहे.

दृष्टी

मानवाची शिकण्याची अमर्याद क्षमता ओळखणे आणि तिचा आदर करणे.

ध्येय

आजीवन शिकत राहण्याची क्षमता विकसित करणारे व्यवस्थात्मक परिवर्तन.

क्षमताधिष्ठित शिक्षण

क्षमताधिष्ठित शिक्षण

प्रत्येक मूल आपापल्या क्षमतेनुसार, आपापल्या गतीने शिकताना दिसते . मग त्या मुलाला शिक्षणासाठी अनुकूल वातावरण मिळवून देणे हे काम शिक्षकांचे, समाजाचे आणि शिक्षण व्यवस्थेचे आहे. . त्यासाठी प्रत्येक मुलाच्या गरजांचे नेमके मूल्यमापन करून त्यानुसार शिकवण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. या कामात शिक्षकांना मदतीची आवश्यकता भासते.
पुढे वाचा

व्यवस्थात्मक बदल

व्यवस्थात्मक बदल

क्षमताधिष्ठित शिक्षणाला अनुकूल वातावरण तयार व्हावे आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा व्हावी याची जबाबदारी शिक्षक, पालक, आणि स्थानिक समुदाय यासारख्या शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक घटकाची आहे. त्यासाठी ग्यानप्रकाश फाउंडेशन या व्यवस्थेतील प्रत्येक घटकाबरोबर काम करते.
पुढे वाचा

सहयोगी प्रयत्न

पुढे वाचा

सहयोगी प्रयत्न - क्षमताधिष्ठित शिक्षण साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीची नेमकी माहिती शिक्षकांना असणे आवश्यक आहे. या माहितीवर आधारित पुढील शिक्षणाच्या योजना आखल्याने विद्यार्थ्यांना खरोखरच एखादा विषय समजला आहे याची खात्री करून घेता येईल. त्यासाठी ग्यानप्रकाश फाउंडेशन ने Gooru आणि इंडिया एज्युकेशन कलेक्टिव्ह यांच्या मदतीने नॅव्हिगेटेड लर्निंग कोलॅबोरेटीव्हची स्थापना केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या शैक्षणिक प्रगतीची माहिती शिक्षण व्यवस्थेतील सर्व घटकांपर्यंत पोचवता येते. त्यातून विद्यार्थ्यांची नेमकी गरज ओळखून त्यानुसार पुढच्या योजना आखायला मदत होते.
पुढे वाचा

आमच्या कामाविषयी

ग्रामीण भागातील शिक्षणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी व्यवस्थात्मक मार्ग

ताज्या घडामोडी

वृत्तपत्र

 परभणी न्यूजलेटर

जानेवारी - मार्च २०२४
या महिन्यात परभणीचे न्यूजलेटर प्रकाशित झाले आहे. यामध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीतल्या घडामोडींची माहिती आणि बदलाच्या गोष्टी वाचता येतील.
पुढे वाचा

कार्यशाळा

जालन्यामध्ये संसाधन व्यक्ती आणि केंद्रप्रमुख यांच्यासाठी कार्यशाळा

जानेवारी - मार्च २०२४
जालना जिल्ह्यामध्ये DIET आणि DEO यांनी निपुण भारत मिशन कार्यक्रमांतर्गत क्षमता आधारित वर्ग प्रक्रिया केंद्रस्थानी ठेवत एका जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. ग्यानप्रकाश फाउंडेशनच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमामध्ये या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी शिक्षक, संसाधन व्यक्ती आणि केंद्रप्रमुख असे प्रमुख भागधारक एकत्र आले होते.
पुढे वाचा

गोष्टी बदलाच्या

रत्नागिरीत सुरू झालेली शैक्षणिक ग्रामसभा चळवळ

जानेवारी - मार्च २०२४
गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वाची ठरते. प्रभावी शैक्षणिक ग्रामसभेसाठी रत्नागिरी जिल्हा परिषद आणि ग्यान प्रकाश फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे घेतलेल्या कार्यशाळेत तालुका गुणवत्ता कक्ष, डेटा आधारित नियोजन, गुणवत्तापूर्ण आणि नियमित शिक्षण परिषदा, केंद्र संसाधन गट, शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया या गोष्टींवर लक्ष देण्याचे ठरले.
पुढे वाचा